खेर्डी येथे महिलेचे २ लाखाचे मंगळसूत्र लांबवले

चिपळूण:- एसटी प्रवासादरम्यान खेर्डी येथील एसटी थांब्यावर उतरत असताना चोरट्याने महिलेचे तब्बल २ लाख किंमतीचे मंगळसूत्र चोरल्याची घटना ३० मे रोजी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात मंगळवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद अनिता पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील व त्यांची मुलगी अशा दोघीजणी ३० मे राजी कराड येथील बसस्थानकातून बेळगाव-दापोली या एसटी बसमधून चिपळूण खेर्डी येथे येत होत्या. असे असताना त्या खेर्डी येथील एसटी थांब्यावर उतरत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे २ लाख रूपये किंमतीचे ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरले. हा प्रकार पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.