अज्ञात दुचाकीची धडक; पादचारी जखमी

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर फाटा येथील रस्त्यावर पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीने धडक दिली. या अपघातात तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश रावजी कदम (रा. नरवण, ता. गुहागर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री पावणेनऊच्या सुमारास वेळणेश्वर फाटा येथील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश कदम हे वेळणेश्वर फाटा येथे रस्त्यावर उभे असताना अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली. या उपघातात ते जखमी झाले. उपचारासाठी वेळणेश्वर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकित या प्रकऱणी नोंद करण्यात आली आहे.