पावसाळ्यात 1 लाख 24 हजार लोकांना पुराचा धोका

रत्नागिरी:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुका व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 206 नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. एकूण 1 लाख 24 हजार 150 लोकांना पुराचा धोका जाणवू शकतो.

सध्या पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. अतिवृष्टीच्या भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेशा औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवणार्‍या गावांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जलजन्य व किटकजन्य आजाराच्या साथी पसरण्याची शक्यता असते. तसेच पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होवून हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या इत्यादी आजार वाढण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने सज्जता राखली जात आहे. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्र, 378 उपकेंद्र व 8 ग्रामीण रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालय, 5 नागरी आरोग्य केंद्र आहेत.

ग्रामीण भागातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे सर्वेक्षण करण्यात येणार असूने, काही त्रुटी असतील तर त्याबाबत ग्रामपंचायतींना पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बाधित होणार्‍या गावांची माहिती एकत्रीत करण्यात आली आहे. संबंधित गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

 गुहागर – अंजनवेल, वेलदूर, वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, पडवे, काताळे, धोपावे, साखरीआगार, नरवण, साखरी त्रिशूळ, विसापूर, कारूळ, परचुरी, कोंडकारूळ, पेवे, कुडली, भातगांव, कोसबीवाडी, गोळेवाडी, पालकोटत्रिशूळ.
 संगमेश्वर – कारभाटले, खडीकोळवण, फणसवणे, पेढांबे, कुचांबे, कोंडगाव, वांद्री, वाशी तर्फे संगमेश्वर, ओझरे बुद्रूक, कुंभारखाणी, कासे, धामापूरतर्फे संगमेश्वर, कुरधुंडा, डिंगणी, गोळवली, धामणी, सोनवडे, सांगवे, तळेकांटे, फणसट, कसबा, कोळंबे, नावडी, तुरळ, मुरडव, आरवली, कळंबुशी, माखजन, प्रिंदवणे, आंबेड बुद्रूक, करजुवे.
 रत्नागिरी – नेवरे, धामणसे, कोतवडे, निवेंडी, भगवतीनगर, चाफे, जांभरूण, आगरनरळ, सोमेश्वर, कशेळी, निवळी, ओरी, चिंद्रवली, पोमेंडी खुर्द, चांदेराई, मावळंगे, कुरतडे, पावस, वेतोशी, टेंभ्ये, खारगाव, चरवेली, वेळवंड, पानवल, कापडगाव, वेल्ये, बोंडये, तरवळ, तोणदे, करबुडे, पोमेंडी बुद्रूक, शिवार आंबेरे, राई, वरके, कळझोंडी, गावडेआंबेरे, नाखरे, कोळंबे, टिके, हरचेरी.
लांजा – साटवली, विलवडे, हर्दखळे, बेनी बुद्रूक, रिंगणे, आंजणारी, कोंडगे, कुरुंग, निवसर, सालपे, कोचरी, शिपोशी, कोर्ले, प्रभानवल्ली, पन्हाळे.
राजापूर -भालवली, दळे, देवाचेगोठणे, दोनिवडे, धाऊलवल्ली, डोेंगर, गोवर, जैतापूर, जुवे, कुवेशी, कुंभवडे, कोदवली, माडबन, नाणार, नाटे, पडवे, प्रिंदावण, सौंदळ, सागवे, शीळ, शिवणेखुर्द, शेजवली, तारळ, उपळे, विल्ये, उन्हाळे, साखरीनाटे, कणेरी, कोंडये, रायपाटण, पाचल, आंबोळगड, निवेली, साखर, येळवंड, मूर, करक, ओशीवळे, परटवली, आडवली, वडदहसोळ, दसूर, देवीहसोळ.
 मंडणगड – पणदेरी, चिंचघर, दुधेरे बागणघर, गोठे, बाणकोट, जावळे, कुंबळे, कादवण, कोंडगांव, म्हाप्रळ, मुरादपुर, माहू बोरघर, निगडी, पाट, पेवे, पालघर, पिंपळगांव, पडवे, शिगवण, तिडेतळेघर, उंबरशेत, वेश्वी, वाल्मीकीनगर, बलोते, भोळवली.

दापोली – टांमर, सोवेली, मौजे दापोली, करंजाणी, गिम्हवणे, आपटी, टाळसुरे, साखळोली, विसापूर, असोंड, दाभोळ, गुडघे, पाचवली, पिराई, कोळथरे, देहेण, कर्दे, मुरुड, पांगरी तर्फे हवेली, सारंग, बुरोंडी, आंजर्ले, भडवळे, इळणे, केळशी, उंबरशेत, सडवे, कोळबाद्री, नावटे, हर्णे, नवशे, ओणनवसे, आडे / पाडले, दाभिळ, जाळगांव, मांदिवली, बोडीवली, साकुडे, आवाशी.
खेड – अळसुरे, आरतान, आष्टी, आंबवली, आंबडस, आंजणी, बहिरवली, बोरघर, भरणे, भोस्ते, चिंचघर, चिंचवली, चौगुले माहेल्ला, दिवाणखवटी, देवघर, धामणंद, धामणदेवी, घेरारसाळगड, हेदली, हुंबरी, कर्जी, कशैडी, कळंबणी बु, कुरवळ-जावळी, कुळवंडी, कुडोशी, कोरेगांव, कोतवली, कोंडीवली, खवठी खोपी, मंबके, नांदगांव, नातूनगर, निळीक, पन्हाळजे, रजवेल, सवणस, सवणस खुर्द, सुसेरी, सुकीवली, संगलट, सार्पिली, शिर्शी, शिव बु., उधळे, वरवली, वेरळ, वावे तर्फे नातू
चिपळूण – मालदोली, गांगई, कारंबवणे, केतकी, कालुस्ते खुर्द, पोफळी, आलोरे, शिरगाव, कुंभार्ली, कोंडफणसवणे, पेढांबे, कोळकेवाडी, खडपोली, कालुस्ते बुद्रुक, पिंपळी खुर्द, मुंढे तर्फे चिपळूण, कळंबस्ते, खेर्डी, खांदाटपाली, दळवटणे, मिरजोळी, नविन कोळकेवाडी, कादवड, आकले, वालोपे, गोंधळे, चिवेली, दोणवली, वाघिवरे, कोंढे, कळकवणे, चिंचघर, वालोटी, नागावे, खेरशेत, नायशी, बु. वहाळ, कोकरे, तळसर, डेरवण, सावर्डा, शिरळ निवळी, कापसाळ, कामथे बु. विर, आमळील, पिलवली तर्फे वेळंब, तुरंबव, ताम्हनमळा, गुळवणे, नारदखेरकी, निरबाडे, कुटरे, येगाव, नांदगांव, मुर्तवडे, दहिवली, मुढे तर्फे सावर्डा, कोसंबी, फुरुस, दुर्गवाडी, ओवळी, आंबतखोल, नांदगांवखुर्द.