गुन्हा दाखल होण्यापुर्वी अनी जाधवचा पळून जाण्याचा ‘प्लॅन’

आर्थिक गुन्हे शाखेकडून स्वतंत्र पथकांची नियुक्ती

रत्नागिरी:- ‘आर्जू टेकसोल’ कंपनीचा मास्टरमाईंड अनी जाधव यांने कंपनी स्थापनेपूर्वीच स्वत:ला वाचविण्यासाठी कंपनीच्या कागदोपत्री व्यवहारापासून तो दुर राहिला होता. कोकणात्याही कागदपत्रावर त्यांचे नाव नसल्याचे पुढे आले आहेच. मात्र कंपनी अडचणीत आली, आपले नाव त्यामध्ये आलेच तर आपण कसे, कुठे गायब व्हायचे असा ‘प्लॅन’ त्याने पुर्वीच आखल्याचे पुढे येत आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच अनी जाधव गायब झाल्यामुळे त्याच्या पळून जाण्याचा ‘प्लॅन’ यशस्वी झाला आहे. अनी जाधवच्या शोधासाठी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके स्थापन केली आहे. मात्र अनी जाधव मूळचा नेमका कुठला आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुंतवणुकदारांना विविध आमिष देत स्वयंरोजगाराचे गाजर दाखवत ही कोट्यवधीच गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढत असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी कर्ज काढुन, दागिने गहाण ठेऊन आर्जूमध्ये गुंतवणुक केली आहे. गुंतवणुक करणार्‍यांना हळूहळू परतावाही मिळत होता. परंतु कंपनी संशयाच्या भोवर्‍यात आली आणि अनेकांची देणी थकली त्यामुळे कंपनीविरुद्ध गुंतवणुदारांनी तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करत दोन संचालकांना अटक केली. तर अनी जाधवसह त्याचा सहकरी सावंत अध्याप पोलीसांना साडलेले नाहीत.

जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास असून कंपनीचे एमआयडीसीतील सुसज्ज ऑफिस, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशिनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटीचा माल पडून असल्याचे समजते. परंतु कंपनीचे हे खुळ एमआयडीसीत एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या अनी नामक व्यक्तीने संचालकांच्या डोक्यात घातले. शेफ म्हणून काम करत असताना संशयित त्याच्या संपर्कात आले. तेव्हा त्याने हा गुंतवणुकीचा फंडा त्यांना सांगितला आणि आर्जु टेकसोल कंपनी स्थापन झाली. विशेष म्हणजे हा मास्टर माइर्ड कंपनीध्ये कोणत्याच पदावर नाही. पडद्यामागुन त्याने ही सूत्र हालवत कंपनी चालवली. परंतु आता तो कोणत्याही चित्रात नसल्याने पोलिस या मास्टमाइर्डच्या मागावर आहेत. त्याच्या शोधासाठी पोलीसांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.