शिवाजीनगर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  निखिल गोपिनाथ तेरेकर, परुशुराम परमाण्णा मुलिमणी, संजय गंगाधर खेत्री अशी संशयिताची नावे आहे. या घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी चार ते पाच यावेळी शिवाजीनगर येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित शिवाजीनगर येथील दारुच्या गुत्त्याच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राहूल जाधव, पोलिस नाईक आशिष भालेकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.