प्रेयसीला भेटल्याच्या रागातून पती- पत्नीत वाद; गुन्हा दाखल

चिपळूण:- प्रेयसीला भेटण्यासाठी पत्नी गेल्याच्या रागातून पतीने ती काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात जाऊन तिच्याशी वाद घातल्याचा प्रकार चिपळुणातील एका शासकीय कार्यालयात साेमवारी घडला. या प्रकाराबाबत पतीविराेधात चिपळूण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिलेच्या पतीचे इंदापूर येथील एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे ही महिला रविवारी इंदापूर येथे पतीच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेली हाेती. तसेच तिच्याशी वाद घातला. याची माहिती तिच्या पतीला कळताच रागातून तिचा पती महिला काम करीत असलेल्या शासकीय कार्यालयात गेला. तिथे त्याने शिवीगाळ करून तिला जाब विचारला.

तसेच तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. त्यातून दोघांमध्ये वादावादी व झटापट झाली. त्याचवेळी संबंधित महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. या प्रकारानंतर संबंधित महिलेने चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पतीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ३२७, ३५३, १८६ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.