साळवी स्टॉप येथे बारमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण

रत्नागिरी:- शहराजवळील साळवी स्टॉप येथील बारमध्ये शाब्दिक वादातून एकाला बार मालकाने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना रविवार, दि. २६ मे रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडली आहे.

या प्रकरणी रमेश चंद्रकांत खेत्री (३४, रा. खेडशी, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी दुपारी रमेश खेत्री त्याच्या तीन मित्रांसह या बारमध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. तेव्हा बार मालकासोबत त्याचा शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर रागाच्या भरात बारमालक त्याचे कर्मचारी तसेच अन्य बाहेरच्या लोकांनी मिळून रमेशला लोखंडी रॉडने मारहाण केली. यात रमेशच्या डोक्याला मुका मार लागला असून पाठीवर वळ उठले होते. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.