सवेणी येथे किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

खेड:-तालुक्यातील सवेणी मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून एकास मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी अली शेख हुसेन चिपळूणकर याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 मे रोजी दुपारी 12.30 या सुमारास घडली. या बाबत शमशुद्दीन शेख हुसेन चीपळूणकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी यांची पुतणी आंबे काढण्यासाठी आली असता सर्वांनी मिळून एकत्रितपणे आंबे काढूया, असे सांगितल्याचा राग मनात धरून पुढे त्याच्या लहान भावाने लाकडी बांबू घेत फिर्यादीच्या घरात प्रवेश करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केल्यामुळे गंभीर दुखापत केली आहे.