जिल्ह्यात आणखी एक वीजचोरी उघड

खेड-तळघर येथेही १३ लाखांची वीज चोरी, दोघांवर गुन्हा

खेड:- तालुक्यातील तक्रघर येथेही गेल्यो १५ महिन्यांपासून वीज चोरी करून ७६ हजार ९३ युनिटसचा वापर करत महावितरणची १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

रामचंद्र भागोजी बुदर, राकेश रामचंद्र बुदर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पेण येथील महावितरणच्या भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिल्याचे समजते.

लोटे यांच्या एमआयडीसी उपविभाग अखत्यारित येणाऱ्या तालुक्यातील तळघर परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धरमसारे, सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशिकुमार तांबे, वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदर व वापरदार राकेश रामचंद्र बुदर यांच्या मालकीच्या चिरेखाणीच्या वीज पुरवठा असलेल्या वीज संचाची तपासणी केली.

या मीटरमधून वापरत असलेल्या बीज पुरवठ्यासंबंधी वीज मीटर हाताळलेला निदर्शनास आला. या मीटरच्या टर्मिनलचे स्कू सैल करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करीत असल्याचे आढळले. जेणेकरून वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये होणार नाही. अशाप्रकारे वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले.

अनधिकृतपणे विजेचा वापर केल्याचा ठपका ठेवत वीज मीटर सील करून ताब्यात घेतले. ही वीज चोरी जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत झाली असून ७६ हजार ९३ युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे. तब्बल १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत चिपळूण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास निकम अधिक तपास करत आहेत.