साखरतर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवरुन मारहाण; सोसायटीच्या माजी चेअरमनला मारहाण

रत्नागिरी:- आयपीएलचा ज्वर तरुणांच्या अजूनही अंगात आहेत. मात्र ज्वराचा परिणाम शहरानजीकच्या साखरतर येथे पहायला मिळाला. आयपीएल क्रिकेटवरुन झालेल्या हाणामारीत सोसायटीच्या माजी चेअरमनला झोडपल्याची घटना काल घडली.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास घडली. केकेआर व सनराईज हैद्राबाद यांच्या आयपीएलची फायनल मॅच झाली. या मॅचमध्ये केकेआर संघ जिंकला याचा आनंद व्यक्त करण्यासाठी साखरतर येथील तरुणांनी रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी केली. आवाजाचा परिणाम रस्त्यावर असलेल्या घराला झाला. त्या घरात लग्न कार्य असल्यामुळे तेथील लोकांनी फटाके वाजविणे बंद करा असे सांगितले याचा राग मनात धरुन क्रिकेट ज्वराने पछाडलेल्या तरुणांनी तेथील सोसायटीच्या माजी चेअरमनला झोडपले असल्याची माहिती मिळत आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती.