रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी असणाऱ्या पाली बावनदी पर्यायी बाह्यमार्गावर आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला कलंडून झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेत हे सर्व प्रवासी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले होते ते परतत असताना हा अपघात होऊन जखमी झाले आहेत.
या अपघाताबाबत पाली ग्रामीण रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाली ते बावनदी या मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी असणाऱ्या अरुंद रस्त्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी प्रवासी आराम बस क्रमांक एम एच ४३ बीपी ७०९७ घेऊन चालक अजय धनंजय दास,२९ रा. कोपरखैरणे सेक्टर १९ नवी मुंबई जात असताना निवळी शेलटेवाडी नजीकच्या वळणावर प्रवासी बस आली असता रस्त्याच्या बाजूला खोलदरीत कलंडून झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधुन २६ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी 22 मे रोजी मुंबई येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आले होते ते आज परत जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांची नावे पुढीलप्रमाणे, भावेश सुशील दमामे (२८ रा. वाशी नवी मुंबई), कनिष्क सोमनाथ भोईर (१५), लक्ष्मी सोमनाथ भोईर (३५), विजय सोमनाथ भोईर२१, कुंदन जयराम भगत (३६), राहुल जयराम भगत ३०, रोहित जयराम भगत (३३), विविल सुरेश भगत (७), रोहित जगदीश भोईर (३५), भाविका सुरेश भोईर (२१), भूमिका सुरेश भोईर (१४), भावना रोहित भगत (१६), दमयंती जगदीश भोईर (६५), अनिता सुरेश भोईर (३६), पायल अभिषेक भोईर (२४), देवयानी किशोर पाटील (४०), शकुंतला दीपक ठाकूर (४४), श्रद्धा रोहित भोईर (३२), भूमी सुरेश भोईर (१४), जागृती कुंदन भोईर (२७, सर्व रा.नवी मुंबई) असे जखमी झालेले प्रवासी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नरेंद्र महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर व शासनाच्या 108 रुग्णवाहिका सेवेचे चालक सुरेंद्र यादव यांनी सर्व जखमींना तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर पाली ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अँथनी कुमार, डॉ. ऋषिकेश, डॉ. स्नेहल शेलार, डॉ.संकेत पाटील,परिचारिका रेश्मा चाफेटकर,सुमन मेश्राम यांनी तातडीने उपचार केले.