जाकादेवी-खालगाव येथे घरफोडी, दागिन्यांसह दुचाकी पळविली

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ते २३ मे सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे पुण्याला गेलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या रहाते घराचे मागील दरवाजाची कडी कोयंडा, कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील व लाकडी पलंगात ठेवलेले सोने-चांदिचे दागिन्याची चोरी केली. यामध्ये २० हजारचे सोन्याचे क्वाईन, १७ हजाराचे सोन्याचे बिस्कट, ८ हजाराचे कर्णफुले, ५ हजाराची नथ, ८ हजाराचे चांदिचे बिस्कीट, १५ हजाराची दुचाकी असा ७३ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविली. तसेच घराच्या शेजारी उभी करुन ठेवलेली दुचाकी (क्र. एमएच-०८ एई ८९३७) चोरुन नेली. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.