मोबाइल कसिनो खेळातून आर्थिक नुकसान झाल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

राजापूर:- मोबाइल कसिनो खेळातुन मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्यातुन राजापूर शहरातील एका ३७ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आपले जीवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यातील मयत युवकाचे नाव विक्रांत विठ्ठल उर्फ राजा देसाइ असे असुन तो शहरातील एक व्यावसायिक होता.

याबाबत सुरु असलेल्या चर्चेनुसार, मयत विक्रांत उर्फ राजा देसाइ याला मोबाइलवर कसिनो खेळण्याचा नाद होता. त्यातुन त्याला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला. मंगळवारी सायंकाळी तो अनेकाना राजापूर शहरात फिरताना दिसुन आला होता. त्यानंतर तो दिसुन आला नाही. परिणामी त्याच्या मित्रपरिवारासह घरच्यानी शोधाशोध करत त्याच्या मोबाइलवर सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोन उचलत नसल्याने सगळीकडे शोधाशोध सुरु होती.

अखेर त्याच्या मोबाइल लोकेशन वरुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो रानतळे येथील एका हापुस आंब्याच्या बागेत तो मृतावस्थेत आढळुन आला. याबाबतची माहिती राजापूर पोलिसाना देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी सायंकाळी ४ वाजता त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

ज्या ठिकाणी विक्रांत याने आत्महत्या केली होती त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळुन आल्याचे बोलले जात आहे. या सुसाईट नोटमध्ये त्याने मोबाइल कसिनो खेळताना झालेल्या आर्थिक नुकसानीतुन आपण जीवन संपत असल्याचे नमुद केल्याचे समजते. मात्र याबाबत राजापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता राजापूर पोलिसानी याबबतची माहिती देण्यास नकार दिला .