जिल्ह्याच्या विकासासाठी बदलाची मानसिकता ठेवा: ना. राणे

रत्नागिरीतील उद्योजकांसोबत साधला संवाद

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून सुजलाम सफलाम करता येईल, औद्योगिकदृष्ट्या सक्षम करता येईल मात्र त्यासाठी सर्वांनी आपली मानसिकता तयार करावी, दृष्टीकोन बदला, आवश्यक सुविधा देण्यासाठी मी सहकार्य करेन असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी केले.

रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध व्यावसायिक उद्योजक यांच्याशी ना. राणे यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थित अनेक रत्नागिरीकरानी आपल्या विविध अडचणी, समस्या आणि प्रस्ताव यावेळी मांडले. या सर्वाना मार्गदर्शन करताना ना. राणे म्हणाले कि उद्योग हे आपल्या उदार निर्वाहाचे साधन होतानाच उत्पादकता कशी वाढवायची याचा अभ्यास केला पाहिजे. आज पर्यटन व्यवसायावर अनेक देश श्रीमंत झाले आहेत. हा एक मोठा व्यवसाय आहे. या सगळ्याचा अभ्यास मी सिंधुदुर्गसाठी केला, त्याचा आराखडा बनविला, सिंधुदुर्गात आलेला पर्यटक 7 दिवस जिल्ह्यात कसा राहील याचे नियोजन केले त्यासाठी टाटा कन्सलटन्सी सारखे अभ्यासकांशी चर्चा केली, त्यातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित झाला. तेच रत्नागिरी जिल्ह्यातही करता येईल, येथील पर्यटन व्यवसाय वाढवता येईल, पण आपल्याकडे कोणता पर्यटक आला पाहिजे हे अधि ठरावा मग त्याप्रमाणे आपल्या परिसराला आणि आपल्यालाही बदला. स्वच्छता, आवश्यक सुविधा निर्माण करा, आपली मानसिकता बदला तरच रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी सुजलाम सफलाम करता येईल यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सहकार्य मी करेन असे प्रतिपादन ना. राणे यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी हॉटेल व्यावसायिकांसह काजू , अंबा व्यावसायिक, सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मते मांडली. यावेळी व्यासपीठावर उद्योजक राजेंद्र तावडे, काकी नलावडे, अप्पा देसाई, प्रसाद कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कोकणचे नाव भक्कम करण्यासाठी ना. राणे यांना पाठींबा देण्याचा निर्धार सर्वांनी केला. यानंतर तालुका चिरेखाण संघटना, मुस्लीम समाज, चर्मकार समाजासह समाजातील विविध स्तरावरील मान्यवरांनी ना. राणे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.