बेपत्ता वृद्धाचा तब्बल आठ दिवसांनी आढळला मृतदेह

रत्नागिरी:- मुलीच्या घरी गेलेल्या वडिलांचा जंगलमय भागात तब्बल आठ दिवसांनी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाळू कृष्णा सुवारे (८५, रा. खानू, कोनवाडे, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.

बाळू सुवारे हे ८ मार्च रोजी मुलीच्या घरी गेले होते. त्यानंतर ते पुन्हा मुलीच्या घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्यांचा कोठेच शोध न लागल्याने त्यांच्या मुलाने रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद केली होती. त्यांचा शोध घेत असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह खानू चांदसूर्या या ठिकाणी जंगलमय भागात आढळला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध रत्नागिरी ग्रामीण पोलिस घेत आहेत.