मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील रशिद दाभिळकर यांच्या क्रशरवर काम करणाऱ्या २१ वर्षीय तरूणाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ मे २०२३ रोजी सकाळच्या सुमारास घडली. यासंदर्भात मंडणगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रशरवर काम करणारा राजू हनूमंत वडार (सध्या राहणार धुत्रोली मूळ गाव गुन्हापूर, गांधीनगर – विजापूर कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे. राजू हा दाभिळकर यांच्या क्रशरवर ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्यावेळी अपघात झाला. आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये दगड भरून तो रँपवर टाकून परत जात असताना उतारावर आला असताना ट्रॅक्टर उजव्या बाजूस कलंडला यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याच्या सोबत अन्य कामगार काम करत होते. त्यांनी त्याला मंडणगड ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अधिक तपास सहायक्क पोलीस फौजदार आळे करत आहेत