तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २० हुन अधिक पत्रकारांना ५ लाखांचे अपघाती विमा कवच

पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अपघात विमा पॉलिसी प्रत्येकी ५ लाखांचा काढण्यात आला. ही पॉलिसी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून २० हुन अधिक पत्रकारांना शुक्रवारी काढून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

दिवसरात्र समाजाच्या घडामोडी टिपण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून अपेक्षित लाभ मिळत नाही, त्यात अपघात झाला तर आर्थिक मदतीची टंचाई होती, लोकांना मदत मिळवून देणारा पत्रकार मात्र अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहतो ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका कडून प्रत्येकी ५ लाखांचे पॉलिसी काढून देण्यात आले. आज पत्रकार विविध अडचणीत असतानाही समाज जनजागृती व समाजाच्या जडणघडणीत देत असतो, अशा सर्व पत्रकारांना अपघात विमा पॉलिसी मिळावी म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .संघमित्रा फुले उपस्थित होत्या तसेच मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरूखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुका अध्यक्ष आनंद तापेकर, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष मुश्ताक खान, सचिव जमीर खलफे, प्रणिल पाटील, सतीश पालकर, मनोज लेले, प्रणव पोळेकर, प्रशांत पवार, अमोल मोरे, रहीम दलाल, अजय सावंत, केतन पिलणकर, समीर शिगवण, अमोल डोंगरे, निलेश कदम, प्रशांत हरचेकर आदी उपस्थित होते.

पत्रकारांना शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील- डॉ.फुले
पत्रकारांना जिल्हा रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्याने लक्ष घालून उपचार केले जातात पत्रकार नेहमीच शासकीय रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतातच त्याचबरोबर समाजातील कामांमध्ये ही पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण असून आरोग्याच्या बाबतीत पत्रकारांनी सजग राहावे, अपघात विमा पॉलिसी काढून एक चांगला आदर्श तालुका मराठी पत्रकार परिषदेने दाखवून दिला आहे.