प्रौढाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी-भातगाव मार्गावरील विल्ये येथे कार दुचाकी अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला़ ही घटना 19 जून रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली़. मारूती चंद्रकांत जांभुटकर (45, जाकादेवी, मुळ कर्नाटक) असे मृताचे नाव आहे़. या प्रकरणी दुचाकी चालक अक्षय सावंत (25, कोसुंब संगमेश्वर मुळ कर्नाटक) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी किरण संभाजी साळुंखे (21, पुणे) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती़. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालक अक्षय सावंत (25, कोसुंब संगमेश्वर मुळ कर्नाटक) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण साळुंखे 19 जून रोजी सायंकाळी कारने जाकादेवी-भातगाव मार्गावरून जात होते़. विल्ये येथे समोरून येणारी दुचाकीने कारला धडक दिली़ यात चालक अक्षय जखमी झाला तर दुचाकीवर मागे बसलेले मारूती जांभुटकर यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला़ अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.