जिल्ह्यात 24 तासात 101 पॉझिटिव्ह रुग्ण; एका मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1409 तपासण्यांमध्ये केवळ 101 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 165 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 165 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यँत 80 हजार 589 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.99 टक्के आहे. नव्याने 101 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 956 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने  आतापर्यंत 2 हजार 516 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 483 तर संस्थात्मक विलीगिकरणात 330 रुग्ण उपचार घेत आहेत.