रत्नागिरी- मडगाव रेल्वे 18 जानेवारीपर्यंत धावणार नाही

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते मडगाव या भागातील विद्युतीकरणाचे काम वेगाने चालु आहे. या मार्गावरील बोगद्यांमधील कामेही करण्यात येत असून त्यासाठी रत्नागिरी- मडगाव- रत्नागिरी ही गाडी 18 जानेवारीपर्यंत धावणार नाही, असे एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

पनवेल ते रत्नागिरीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्राथमिक चाचण्याही झाल्या आहेत. रत्नागिरी ते मडगाव या भागातील कामे हाती घेण्यात आले आहे. या भागातील बोगद्यामध्ये वाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी ही गाडी सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.