गटारीचे जोरदार सेलिब्रेशन; चिकन, मटण सेंटरवर मोठी गर्दी

रत्नागिरी:- रविवारी आलेली गटारी रत्नागिरीत जोरदार साजरी करण्यात आली. अनेकांनी यावेळी पार्टीचे नियोजन केले होते. चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होती. 
रत्नागिरीत रविवारी एक टन मासळी, 100 ते 200 टन चिकन आणि सुमारे एक टन बकऱ्याचे मटण फस्त करत रत्नागिरीकरांनी गटारी घरीच साजरी केली. 

आषाढ महिना रविवारीच संपत आहे. शनिवारी सायंकाळी गटारी अमावस्या सुरू झाल्याने रविवारी गटारीचा बेत आखला होता. गटारीला मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो. रविवारी मटण शॉप, चिकन सेंटर सहमच्छी मार्केट मध्येरत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टनसिंग चा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाच्या भीतीपुढे गटारीचा आनंद मोठा असल्याचे रविवारी दिसून आले.