जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसने एकाचा मृत्यू

रत्नागिरी:-: जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसचा उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्हयातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसमुळे आज झालेल्या मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या 3 झाली आहे. जिल्ह्यात म्यूकर मायकोसीसचे आतापर्यंत 8 रुग्ण आढळले. त्यात हे 3 मृत्यू असून 2 जणांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.