जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिर; 24 तासात 567 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात साडणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. मागील 24 तासात 567 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी याच काळात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाचशेवर रुग्णसंख्येची नोंद झाल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. 567 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 40 हजार 200 झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या गेल्या रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655, बुधवारी 610, गुरुवारी 389 तर शुक्रवारी 590 तर शनिवारी 582 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. रविवारी रुग्णसंख्या 40 हजारापार पोचली आहे. नव्याने 567 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1505 पैकी 353 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 786 पैकी 214 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.