जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन 

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या 62 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन हे रत्नागिरी तालुक्यात आहेत. 62 पैकी 23 कन्टेन्मेंट झोन एकट्या रत्नागिरी तालुक्यात आहेत. 

रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये 1, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 7 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 14 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 गावामध्ये आणि राजापूर तालुक्यात 4  गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.