आईसह दीड वर्षाच्या बाळाला कोरोना

रत्नागिरी:- अखेर जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांचा ४५० चा टप्पा पूर्ण झाला आहे. बुधवारी रात्री उशीरा १० अहवाल पॉझिटीव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४५९ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, रत्नागिरीत एका दीड वर्षाच्या बाळासह त्याच्या आईला तर गुहागरात एका आरोग्य कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४५० चा टप्पा गाठून पुढे गेली आहे. बुधवारी रात्री उशीरा १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कळंबणी रूग्णालयातील ५, रत्नागिरी रूग्णालयातील २, गुहागर १ तर देवरूख २ असे मिळून १० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.