जिल्ह्यात 90 हजारजण होम क्वारंटाईन

रत्नागिरी:- मुंबईसह पुण्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या 90 हजारावर पोचली आहे. यापैकी 89 हजार 198 जण होम क्वारंटाईन तर 203 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 
 

जिल्ह्यात तपासणीसाठी 5 हजार 591 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 196 अहवाल पॉझिटिव्ह तर 5 हजार 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 368 अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 76 रुग्ण उपचारांती बरे झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 115 जण उपचाराखाली रुग्ण आहेत.   

मिरज येथून सायंकाळी 128 अहवाल प्राप्त झाले. यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये दापोलीतील 25, कळबणी 1, संगमेश्वर 58, रत्नागिरी 21, कामथे 14 आणि राजापूर येथील 9 नमुन्यांचा समावेश आहे.