रत्नागिरी:- रत्नागिरीतील वैश्य समाजाच्या युवकांनी स्थापन केलल्या वैश्ययुवा संघटनेचा पहिला वर्धापनदिन 27 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवाचे फेसबुक पेज व लोगो यांचे अनावरण राधाकृष्ण वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलूष्टे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी गेल्या वर्षभरा मध्ये वैश्ययुवा मार्फत झालेल्या 14 उपक्रमाची माहिती देण्यात आली.
वैश्य समाजातील युवकांनी एकत्र येत वैश्य युवा संघटनेची स्थापना केली. ही संघटना समाजातील आरोग्य, शैक्षणिक आणि विविध समाज उपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असते.
मागील वर्षभरात संघटनेमार्फत विविध समाजउपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात रक्तदान शिबिर, लॉकडॉऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करत केलेली मदत असेल, मोफत नेत्र तपासणी शिबीर देखील हाती घेतले. त्याचसोबत संघटनेच्या युवकांनी माचाळ ट्रेक, सायकलिंग सारखे आरोग्य विषयक उपक्रम देखील यशस्वीपणे हाताळले.भविष्यात वैश्य युवा मार्फत असेच सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला. या दिमाखदार कार्यक्रमाला वैश्ययुवा संघटनेची सर्व टीम उपस्थित होती.