मिरजोळे चोरी प्रकरणी चार चोरटे सीसीटिव्हीत कैद

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे हनुमाननगर परिसरात मंगळवारी रात्री एका क्लिनिकमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रय़त्न केला. क्लिनिकचे तोडून आतील कपाटही फोडले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही न लागल्याने ते पसार झाले. ४ चोरटे त्या ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही फुटेज कैद झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहर परिसरात ठिकाणठिकाणी चोरट्यांचा उच्छाद सुरु आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यासह रात्रीच्या वेळीही बंद घरावर चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. मात्र या बाबत पोलिसांकडे गुन्हे दाखल होवूनही अजूनही चोरट्यांचा उच्छाद थांबलेला नाही. मंगळवारी (ता. ७) रात्री मिरजोळे हनुमाननगर येथील वस्तीत एका क्लिनिकमध्ये घरफोडी करण्यात आली. चोरट्यांनी बंद क्लिनिकचे ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आतील कपाट व त्यांचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त केले. मात्र कोणताही किमती ऐवज चोरट्यांच्या हाती लागलेला नाही. ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली घडल्या प्रकरणाविषयी त्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले त्यामध्ये चार चोरट्या घराच्या आवारात वावरताना दिसत आहेत.