मारुती मंदिर येथे वॅगनर कारला एसटी बसची धडक, वृध्दा जखमी

रत्नागिरी:- शहरातील सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर येथे वॅगनर कारला एसटी बसची पाठीमागून धडक बसल्याने वृध्दा जखमी झाली. अपघाताची ही घटना 9 मे रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातपकरणी एसटी बस चालक सचिन पांडुरंग कांबळे (38, एसटी डेपो, रत्नागिरी, मूळ करवीर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 9 मे रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर, रत्नागिरी येथे शिवसेना खासदार कार्यालयासमोर रोडच्या मध्यभागी इर्टिगा कार घेतल्याने वॅगनर चालक फिर्यादी यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला. मात्र याचवेळी पाठीमागून आलेल्या एसटी बस चालक सचिन कांबळे याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता कारला पाठीमागून जोरदार धडक fिदली. या अपघातात वॅगनार गाडीचे नुकसान झाले. तसेच एसटी बसमधील पवासी श्रीमती अनघा किशोर मयेकर (58, आरे मयेकरवाडी, रत्नागिरी) या जखमी झाल्या. त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्यापकरणी बस चालकावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.