मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णींसह ६ जणांवर गुन्हा

तालुका अध्यक्षांना मारहाण करणे भोवले

रत्नागिरी:- मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांना मारहाण केल्या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी याच्यासह अन्य पाच जणांचा यामध्ये समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, 3 सप्टेंबरला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मनसे तालुका रुपेश जाधव आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी गाडीत बसत असताना मारहाण केल्याची तक्रार रुपेश जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्याप्रमाणे संशयित आरोपी म्हणून रुपेश श्रीकांत चव्हाण, राहुल दीपक खेडेकर, आशिष मल्लेश कट्टी मणी, सचिन सदानंद शिंदे, सिकंदर यासीन खान आणि मनसेचेच शहराध्यक्ष अद्वैत सतीश कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला जिल्हाध्यक्ष अविनाश सौदंळकर याच्या सांगण्यावरून शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्या सोबत केल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला. याबाबत त्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार ही नोंदवली आहे. त्यावरून सहा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय पवन कांबळे हे याचा अधिक तपास करत आहे.