जामगे येथे दोघांकडून दोन महिलांचा विनयभंग; गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यांतील जामगे येथील दोन महिला आजारी व्यक्तीला बघायला जात असताना दोघांनी त्यांचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलांनी दापोली पोलीस ठाण्यात केली आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामगे येथील दोन सख्ख्या जावा जामगे मोहल्ला येथील घरातून एका रुग्णाला पहायला रस्त्याने पायी चालत जात असताना महमद अली दाऊद नागोठणे हा कार घेवून त्यांच्यासमोर आला व गाडी उभी करून गाडीतून खाली उतरला. तसेच मुज्जफर अस्लम नागोठणे हा मोटारसायकलने तेथे आला या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. याबाबत त्या दोन महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.