रत्नागिरी:- चंपक मैदान व काजळी नदीच्या किनारी झाडीच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार सुरेश यादव (३३) व श्रीकांत केशव राऊत (वय ४५) अशी संशयिताची नावे आहे. या घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी पाच व सातच्या सुमारास चंपक मैदान व काजळी नदी किनारी झाडीझूडपात निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस लक्ष्मण कोकरे व पोलिस शिपाई राजेंद्र वळवी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.