रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत 104 अर्ज दाखल झालेले आहेत.
उमेदवारी दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे.
आरक्षित प्रभागात जात पडताळणी करण्यासाठी वेळ लागत आहे. ऑनलाईन पडताळणीनंतर उमेदवारी अर्ज भरावे लागत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत आगरनरळ 3, गडनरळ 3, कोतवडे 1, चवे 4, डोर्ले 2, गणपतीपुळे 14, कोळंबे 1, खालगाव 2, हातखंबा 4, सडामिर्या 7, नाखरे 9, सोमेश्वर 11, खरवते 1, सैतवडे 7, गुंबद 3, भाटये 6, वरवडे 1, उक्षी 2, वाटद 2, कळझोंडी 1, पाली 2, पावस 13 अर्ज दाखल झाले आहेत.