रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील चोवीस तासात नऊ अहवाल आले असून यातील तब्बल सात अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले असून पॉझिटीव्ह रुग्ण मुंबईतुन दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. मोठया संख्येने चाकरमानी कोकणात दखल होत आहेत. या चाकरमान्याना होम क्वारंटाईन केले जात आहे. लक्षणे असलेल्या चाकरमान्यांचा नमुना तपासणीसाठी पाठवला जात आहे. मागील काही दिवसात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बाधित रुग्ण हे मुंबईकर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान मागील चोवीस तासात नऊ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील सात अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वरवली- धुपेवाडी, कोरेगाव- बेलवाडी, दहिवली- धामणदेवी, चिपळूण, होडबे- दापोली आणि दहिवली येथील 2 असे सात रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आता 113 वर पोचली आहे.









